पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २० फेब्रुवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  कौटुंबीक समस्येमुळे मन निराश होईल. भौतिक सुखात वाढ होईल. धार्मिक यात्रेला  जाण्याचा योग आहे. नोकरीत प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. परिश्रम अधिक घ्यावे लागतील. 

वृषभ -  मन प्रसन्न राहिल मात्र स्वत:वर संयम ठेवा. कौटुंबीक समस्येमुळे मन चिंतेत राहिल. खर्चात वाढ होईल. रागाचा अतिरेक टाळा. नोकरीत इच्छेविरुद्ध परिवर्तनाची शक्यता आहे. कुटुंबात धार्मिक कार्याची शक्यता . 

मिथुन - मन अशांत राहिल. अनामिक भीतीनं मन ग्रासेल. आत्मविश्वास भरपूर जाणवेल. कार्यात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. धैर्यशीलताही कमी असेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होईल.  कार्यक्षेत्रात परीवर्तनाचा योग आहे. स्वभाव चिडचिडा राहिल.  नोकरीत कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.

सिंह - पाठ- पठनात रुची वाढेल. आपल्या भावनांना आवर घाला. कुटुंबात धार्मिक कार्याची शक्यता. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल.  उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग प्राप्त होईल. 

कन्या - शैक्षणिक कार्यात सफलता प्राप्त होईल. आशा- निराशा मिश्रित भाव असतील. कौटुंबीक समस्येनं मन ग्रासेल. खर्चात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. मान- सन्मान प्राप्त होईल.

तूळ - वडिलांच्या तब्येतीस जपा. आत्मविश्वास भरपूर वाढेल. रागाचा अतिरेक टाळा. घरात मंगलकार्य पार पडेल.  मन अशांत राहिल. परिश्रम अधिक घ्यावे लागतील. 

वृश्चिक - कला आणि संगीतात रुची वाढेल. मनात निराशा आणि असंतोष खदखदत राहिल. संपत्तीच्या कारणामुळे  भावंडात विवाद होतील. शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. 

धनू -  नोकरीत प्रगतीची शक्यता आहे, मात्र तुमचं स्थानही बदलू शकतं. कामानिमित्तानं दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा योग आहे. कौटुंबिक समस्यानं मन ग्रासेल. अधिक परिश्रम घ्यावे लागतील. 

मकर - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी पर्यटनाला जाण्याचा योग येईल. बोलताना संयम ठेवा. मित्रांचं सहकार्य लाभेल. आरोग्याला जपा.  

कुंभ - मनात आशा- निराशा मिश्रित भाव राहतील. कुटुंबात कलहाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. 

मीन - कौटुंबिक समस्येमुळे  मन अशांत राहिल. स्वभावत चिडचिडेपणा जाणवेल. उत्पन्नात वाढ होईल पण खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता. मान- सन्मानाची  कमी जाणवेल. 
पं. राघवेंद्र शर्मा