पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १७ ऑक्टोबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - वाणीत सौम्यता राहिल. उत्पन्न समाधानकारक राहिल. व्यवसायात सुधारणा होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृषभ - मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. धैर्यशीलतेत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल. 

मिथुन - कला आणि संगीत क्षेत्रात रस निर्माण होईल. नोकरीत अधिकाऱ्यांबरोबर मतभेद असतानाही प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.

कर्क - आत्मविश्वास जाणवेल. मानसिक शांतता राहिल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यांत यश मिळेल. मान-सन्मान वाढेल.

सिंह - आत्मसंयत राहा. क्रोध जाणवेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहिल. धार्मक कार्यांवर खर्च वाढू शकतो.

कन्या - मन अशांत राहिल. धैर्यशीलता कमी राहिल. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. परंतु, खर्च अधिक राहिल.

तूळ - मानसिक शांतता राहिल. परंतु, वडिलांच्या आरोग्यामुळे त्रस्त असाल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक राहिल.

वृश्चिक - क्षणात दुःखी, क्षणात आनंदी असे भाव राहतील. उत्पन्नात अडचणी येतील तसेच खर्च अधिक राहिल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.

धनू - मन अशांत राहिल. परंतु, बहिणीच्या सहकार्यांने व्यवसायाला गती मिळू शकते. लाभात वाढ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

मकर - आत्मविश्वास कमी असेल. अधिक खर्चामुळे त्रस्त असाल. आई-वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते.

कुंभ - कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. मान-सन्मान मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. अधिक कष्ट करावे लागेल.

मीन - धार्मिक कार्यांत व्यस्तता वाढू शकते. कुटुंबाबरोबर प्रवासाला जाण्याचे योग. प्रवास कष्टमय राहू शकतो.

पं. राघवेंद्र शर्मा