पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १५ ऑगस्ट २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वास कायम राहिल. मात्र अतिरेक टाळा. मित्राच्या मदतीने व्यवसायात संधी मिळू शकते. 

वृषभ - मन अशांत राहिल. कामात जास्त मेहनत करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. 

मिथुन - बोलण्यावर कठोरतेचा प्रभाव होऊ शकतो. संभाषण करताना संतुलित रहा. संचित धन कमी होऊ शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

कर्क - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. अनियोजित खर्च वाढेल. मित्राच्या मदतीने नोकरीमध्ये संधी मिळू शकते. 

सिंह - आत्मविश्वास कमी होईल. उत्पन्न कमी आणि जास्त खर्च होऊ शकतो. स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. 

कन्या - मन शांत राहिल. व्यर्थ भांडण आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. 

तूळ - धैर्याचा अभाव असेल. बोलताना संयम ठेवा. कुटुंबात मान-सन्मान वाढेल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. धार्मिक संगीताकडे कल वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगती होईल. 

धनू - बोलण्यात सौम्यता राहिल. कौटुंबिक समस्यांमुळे त्रास होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितींचा सामना करवा लागू शकतो. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. अनियोजित खर्च वाढेल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

कुंभ - मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव असेल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत असाल. वडिलांचे सहकार्य मिळेल. 

मीन - आत्मविश्वास वाढेल. राग सुध्दा वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. 


पं. राघवेंद्र शर्मा