पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १४ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - धैर्यशीलता कमी होईल. धर्माबद्दल श्रध्दा वाढेल. गोड खाण्याकडे कल वाढेल. उत्पन्न समाधानकारक असेल. 

वृषभ - मानसिक शांती राहिल. मात्र कौटुंबिक समस्यांनी चिंतेत रहाल. उत्पन्न कमी आणि खर्च वाढेल. 

मिथुन - धैर्यशीलता कमी होईल. मुलांना त्रास होईल. नौकरीत पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्न वाढेल.  

कर्क - आत्मविश्वास राहिल. मात्र कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. अनियोजित खर्च वाढेल. 

सिंह - आईला आरोग्याचे विकार होतील. वडिलांचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्न वाढेल. 

कन्या - एखाद्या राजकीय नेत्याची भेट होईल. कामामध्ये अडथळे येतील. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. 

तूळ - कुटुंबात परस्पर मतभेद राहतील. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. शैक्षणिक आणि संशोधन कामात सुखद परिणाम होतील. 

वृश्चिक - मनामध्ये आशा-निराशा असे भाव राहतील. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल. अधिक कष्ट करावे लागतील. 

धनू - आत्मविश्वास वाढेल. मात्र अतिउत्साही होणे टाळा. बोलताना संयम ठेवा. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम होतील. 

मकर - कौटुंबिक जीवन सुखमय असेल. जुन्या मित्रांशी संपर्क होईल. प्रवास चांगला होईल. 

कुंभ - कुटुंबात सुख-शांती राहिल. भावाच्या मदतीने व्यवसायाचा विस्तार होईल. नफा वाढेल. 

मीन - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. बहिण-भावांचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. 

पं. राघवेंद्र शर्मा