पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १३ फेब्रुवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. सुखात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्य संभवतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.  यशाचा मार्ग सुकर होईल. 

वृषभ - मानसिक शांती लाभेल मात्र स्वत:वर संयम ठेवा. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. जोडीदारास आरोग्याची समस्या जाणवेल. उतिउत्साहीपणा टाळा. आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन - आत्मविश्वास भरपूर असेल मात्र एक अनामिक भीती मनात जाणवेल.  मन शांत आणि प्रसन्न राहिल. अनेक कठीण प्रसंगाना सामोरं जावं लागेल. जुन्या मित्राचं आगमन होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

कर्क - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. आत्मविश्वासाची  कमी जाणवेल. बोलताना संयम बाळगा. रागाचा अतिरेक टाळा. नोकरीत परिवर्तनाची शक्यता. 

सिंह - बोलताना संयम बाळगा. स्वभाव चिडचिडा राहिल.  मानसिक शांती लाभेल. आई- वडिलांचं सहकार्य लाभेल. जुन्या मित्राची भेट होईल. भवन सुख प्राप्त होईल. 

कन्या -  महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल.  कौटुंबिक समस्या उद्भवेल. आरोग्याची काळजी घ्या. धनलाभाचा योग आहे. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होईल. 

तूळ - कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. नोकरीत परिवर्तनाचा योग आहे. अधिक मेहनत घ्यावी लागेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक - बोलण्यात कठोरता जाणवेल. नोकरीत कार्यक्षेत्राचा विस्तार संभवेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. बोलताना संयम बाळगा. व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. 

धनू - संतती  सुख लाभेल. आळशीपणा जाणवेल. नोकरीत परीवर्तनाचे योग आहेत. कुटुंबापासून दूर जावं लागेल.  उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. आईचे सहकार्य लाभेल. 

मकर - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. स्वभाव चिडचिडा राहिल. आईसोबत वैचारिक मतभेदांची शक्यता. वादा घालणं टाळा. नोकरीत इच्छेविरुद्ध अतिरिक्त जबाबदारी अंगी पडेल. 

कुंभ - आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. मानसिक शांती राहिल. आई- वडिलांसोबत तिर्थक्षेत्री जाण्याचे योग. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. 

मीन - मित्रांसोबत मतभेदाची शक्यता आहे. स्वत:वर  संयम ठेवा. कौटुंबिक जीवन अधिक कष्टदायी असेल.  वडिलांचे सहकार्य लाभेल. वाहन सुखाचा लाभ मिळेल.