पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १२ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मन अशांत राहिल. मुलांना आरोग्याचे विकार होतील. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात.

वृषभ - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कौटुंबिक समस्येने चिंतेत रहाल. आई-वडिलांच्या विरोधाचा सामना करावा लागेल. धार्मिक कार्यात व्यग्र रहाल. आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन - मनात असंतोषाचे भाव राहतील. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. खर्च वाढेल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलताना संयम ठेवा. 

कर्क - आत्मविश्वास राहिल. धैर्यशीलता वाढेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. राग वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

सिंह - मन अशांत राहिल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आईकडून पैसे मिळतील. शिक्षणात अडचणी येऊ शकतात.

कन्या - व्यवसायात वाढ होईल. फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. वडिलांनी आरोग्याची काळजी घ्या. आळशीपणा जास्त राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

तूळ - कला आणि संगीताकडे कल वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास कमी होईल. मन अशांत राहिल. उत्पन्न वाढेल. 

वृश्चिक - आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. नोकरीत कामाचा विस्तार होईल. उत्पन्न वाढेल. 

धनू - मानसिक शांती राहिल. आळशीपणा वाढेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. बोलण्यात सौम्यता राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. मानसिक शांती मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

कुंभ - धार्मिक संगीतात रस राहिल. मुलांकडून सुखद बातमी मिळेल. आईकडून पैसे मिळू शकतात. धैर्यशीलता कमी होईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी भेट द्याल. 

मीन - मानसिक शांती राहिल. कामात अडचणी येऊ शकतात. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. अचानक धन प्राप्ती मिळू शकते. 

पं. राघवेंद्र शर्मा