मेष - दाम्पत्य सुखात वाढ होईल. मानसिक शांतता राहिल. शैक्षणिक कार्यांत अडचणी येतील. व्यवसायाच्या स्थितीत सुधारणा होईल.
वृषभ - धैर्यशीलता कमी असेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च अधिक असेल. संततीला कष्ट घ्यावे लागतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
मिथुन - एखाद्या अज्ञात भीतीने त्रस्त असाल. राहणीमाना कष्टप्रद असेल. आरोग्याप्रती सावध राहा. संतती सुखात वाढ होईल.
कर्क - मानसिक समस्या वाढतील. कुटुंब आणि मित्रांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग.
सिंह - क्षणात दुखीः क्षणात आनंदी असे भाव असतील. शिक्षण आणि शोध कार्यांत यश मिळेल. कला आणि संगीताप्रती आवड निर्माण होईल.
कन्या - मानसिक तणाव राहिल. जुन्या मित्राचे आगमन होऊ शकते. आरोग्याकडेही लक्ष द्या.
तूळ - नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाचा विस्तार होईल. बदलीची शक्यता.
वृश्चिक - शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी एखाद्या दूरच्या ठिकाणी जाण्याची शक्यता. खर्चांत वाढ होईल.
धनू - मन अशांत राहिल. कुटुंबाला अडचणीला सामोरे जावे लागेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर - वाणीत सौम्यता राहिल. शैक्षणिक कार्यांत सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाची संधी मिळू शकते.
कुंभ - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
मीन - आत्मसंयत राहा. मन अशांत राहिल. नोकरीनिमित्त परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग. राहणीमान कष्टप्रद होऊ शकते.
पं. राघवेंद्र शर्मा