पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २ एप्रिल २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  बोलताना  संयम ठेवा. मित्राचं सहाकार्य प्राप्त होईल. कुटुंबातील महिलेकडून धनलाभाचा योग.

वृषभ - कला- संगीतात रुची वाढेल. मानसिक शांती लाभेल. मात्र खर्चात वाढ झाल्यानं मन चिंतेत राहिल. कार्यक्षेत्रात  कठीण प्रसंगाचा  सामना करावा लागेल. 

मिथुन - मानसिक शांती प्राप्त होईल आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  व्यवसायात सफलता प्राप्त  होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीचे योग.

कर्क - आशा-निराशा मिश्रीत भाव मनात राहतील. कठीण परिस्थितीचा  सामना करावा लागेल. मन अशांत राहिल. कुटुंबांचं सहकार्य प्राप्त होईल.

सिंह - मन अशांत राहिल. रागाची परिसीमा गाठेल. स्वभाव चिडचिडा राहिल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या - मन चिंतेत राहिल. मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी मतभेद वाढतील. 

तूळ - मन अशांत राहिल मात्र कुटुंबीयांची साथ लाभेल. आई-वडिलांशी वैचारिक मतभेद होतील. मित्रांचं सहकार्य लाभेल. 

वृश्चिक - कामात उत्साह वाढेल. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. कला आणि संगीतात रुची वाढेल. परिश्रम अधिक घ्यावे लागतील. 

धनू - आशा-निराशा मिश्रीत भाव मनात येतील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कौटुंबीक समस्यांमुळे मन बेचैन होईल. जोडीदाराला आरोग्याच्या समस्या जाणवतील. तब्येतीची काळजी घ्या.

मकर - मनात नकारात्मक भाव राहतील. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद  होतील. रागाचा अतिरेक टाळा. कार्यक्षेत्रात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.

कुंभ -  मन अशांत राहिल. वाद-विवाद टाळा. आईची मदत होईल. शत्रूवर विजय मिळवाल. अधिक मेहनत घ्यावी लागेल.

मीन - संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. उत्पन्नाचा नवा मार्ग सापडेल.