पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरूवार | १६ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष -  कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. राहणीमान कष्टदायी असेल मात्र मान- सन्मान मिळेल. आई- वडिलांचे सानिध्य लाभेल. आई- वडिलांची प्रकृती बिघडू शकते. 

वृषभ -  आशा- निराशा मिश्रीत भाव राहतील. कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतील. मित्राचं आगमन होऊ शकतं. मित्राच्या मदतीनं  नोकरीची संधी मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. 

मिथुन - मन अशांत राहिल. वाहन सुख लाभेल. एखाद्या राजकिय नेत्याला भेटण्याचा योग येईल. आईची प्रकृती बिघडू शकते. धनलाभाचा योग आहे. 

कर्क - मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची  कमी जाणवेल. जोडीदारासोबत वैचारिक मदभेद संभवतील. जुन्या मित्राच्या संपर्कात येऊ शकता.  अधिक कष्ट घ्यावे लागतील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. 

सिंह - मन अशांत राहिल. मनात निराशेचा किंवा असंतोषाचा भाव राहिल. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. वाद- विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. 

कन्या - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत परिवर्तनाची शक्यता. 

तूळ -  कला व संगितात रुची वाढेल. बोलण्यात संयम बाळगा. कार्यक्षेत्रात परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल. वडिलांची प्रकृती बिघडू शकते. रागाचा अतिरेक टाळा. मित्रासोबत पर्यटनाला जाण्याचा योग आहे. 

वृश्चिक - स्वभाव हट्टी राहिल. क्षणाक्षणाला स्वभाव बदलेल. कौटुंबिक समस्या मन अस्वस्थ करतील. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. खर्चात वाढ होईल.  नोकरीत परिवर्तनाचे योग आहेत. उत्पन्नातही वाढ होईल. 

धनू - मानसिक शांती लाभेल. आईचे सहकार्य लाभेल. मित्राचंही सहकार्य लाभेल. कुटुंबात सुख- शांती नांदेल. पैशांची कमी जाणवेल.

मकर - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. स्वत:वर नियंत्रण ठेवा. काही कठीण प्रसंगाला सामोर जावं लागेल. कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. 

कुंभ - नोकरीच्या ठिकाणी सहाकाऱ्यांचं सहाय्य मिळेल. प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. खर्चात वाढ होईल. मानसिक शांती राहिल. आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल, मात्र स्वभाव चिडचिडा राहिल. 

मीन -  क्षणाक्षणाला स्वभाव बदलेल. मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मित्रांसोबत पर्यटनाला जाण्याचा योग्य येईल.

पं. राघवेंद्र शर्मा