पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | ६ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - वैवाहिक सुखात वाढ होईल. खर्च वाढेल. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. मित्राच्या मदतीने व्यवासाय वाढू शकतो. 

वृषभ - आत्मसंयम ठेवा. धैर्याचा अभाव असेल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. 

मिथुन - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. मानसिक शांती मिळेल. वैवाहिक सुख कमी होईल. 

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. धर्माबद्दल आदर राहिल. वाहन सुखाद वाढ होऊ शकते. आईचा सहवास मिळेल. 

सिंह - मानसिक शांती मिळेल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलताना संयम ठेवा. बहिणीं मदतीने व्यवसाय वाढू शकतो. 

कन्या - मन अशांत राहिल. मानसिक ताण राहिल. कुटुंबात परस्पर मतभेद होऊ शकतात. धार्मिक संगीताकडे कल वाढेल. 

तूळ - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. संचित धन कमी होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - बोलण्यात सौम्यता राहिल. मात्र धैर्यशीलता कमी असेल. कपड्यांवरील खर्च वाढेल. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

धनू - मानसिक शांती मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. राहणीमान अव्यवस्थित राहिल. मान-सन्मान वाढेल. 

मकर - मनात असंतोष आणि निराशेचे भाव राहतील. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. 

कुंभ - मानसिक शांतता राहिल. बोलताना संयम ठेवा. वाहन सुखात वाढ होईल. उत्पन्न वाढेल. 

मीन - धैर्यशीलता कमी असेल. मित्राच्या मदतीने व्यवसायात संधी मिळू शकते. खर्च वाढेल. प्रवास करु शकाल. 

पं. राघवेंद्र शर्मा