पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १८ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मविश्वासात वाढ होईल. क्षणात दुःखी आणि क्षणात आनंदी असे भाव मनात येतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल.

वृषभ - मानसिक शांतता राहिल. एखाद्या जुन्या मित्राचे आगमन होऊ शकते. कुटुंबात सुख-शांती राहिल. उत्पन्नात वाढ होईल.

मिथुन - मानसिक शांतता राहिल. नोकरीच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील. नोकरीत बदलीचे योग आहेत. 

कर्क - मन अशांत राहिल. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील. उत्पन्नात वाढ होईल.

सिंह - आत्मविश्वासात वाढ होईल. परंतु, आत्मसंयत राहा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

कन्या - नाहक वादांपासून दूर राहा. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. व्यवसाय वाढीचे योग आहेत.

तूळ - मानसिक शांतता राहिल. परंतु, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. भाऊ किंवा बहिणीकडून धन प्राप्तीचे योग आहेत. उत्पन्नात वाढ होईल. 

वृश्चिक - संततीकडून एखादी आनंदाची वार्ता मिळू शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल.

धनू - मन अशांत राहिल. आळस अधिक असेल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.
 
मकर - मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. संततीला कष्ट करावे लागू शकतात. कुटुंबासोबत प्रवासाला जाऊ शकता. 

कुंभ - क्षणात दुःखी- क्षणात आनंदी भाव राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गोड खाण्याची आवड निर्माण होईल. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन - धर्म-कर्मात रुची वाढेल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग. कपड्यांवर खर्च वाढेल. 

पं. राघवेंद्र शर्मा