पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १७ नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - आत्मसंयत राहा. धैर्यशीलता कमी राहिल. कौटुंबिक समस्या अजून त्रस्त करतील. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते.

वृषभ - आत्मविश्वास परिपूर्ण असेल. परंतु, धैर्यशीलता कमी राहिल. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. गोड खाण्याची इच्छा होईल.

मिथुन - मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. परंतु, स्वभावात थोडा चिडचिडेपणा राहिल. उत्पन्नाचे स्त्रोत विकसित होतील.

कर्क - आत्मविश्वास कमतरता जाणवेल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. एखाद्या धार्मिक स्थानी यात्रेला जाण्याची शक्यता आहे.

सिंह - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास परिपूर्ण राहिल. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कन्या - मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवू शकतो. धैर्यशीलता कमी राहिल. आत्मसंयत राहा. धार्मिक संगीतात रुची वाढेल.

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आत्मसंयत राहा. आईशी मतभेद होऊ शकतात. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

वृश्चिक - मन अशांत राहिल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या.

धनू - आत्मविश्वासात वाढ होईल. क्षणात आनंदी-क्षणात दुखी असे भाव राहतील. स्वभावात जिद्दीपण जाणवेल. आरोग्याप्रती सावध राहा.

मकर - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ - मानसिक शांतता राहिल. पठन-पाठनात रस निर्माण होईल. लेखन-बौद्धिक कार्यातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

मीन - आत्मविश्वास जाणवेल. परंतु, वाणीवर कठोरतेचा प्रभाव राहू शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल.

पं. राघवेंद्र शर्मा