पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १५ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मविश्वास प्रंचड असेल पण धैर्य आणि संयम यात कमी असू शकते. कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. कुटुंबासमवेत धार्मिक ठिकाणी प्रवासाचा योग संभवतो. दिवस कष्टदायी असू शकेल. 

वृषभ -  मानसिक शांती मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात. 

मिथुन - आत्मविश्वास वाढेल. मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक समस्या सतावतील. भौतिक  सुखासाठी खर्च वाढेल.

कर्क - आत्मविश्वास वाढेल. अतिउत्साही होणे टाळा. संवादामध्ये संतुलन ठेवा. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह -आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकेल. मित्राच्या मदतीने नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.  
 
कन्या - मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वासात वाढ होईल. कौटुंबिक सुख-शांति लाभेल. नोकरीमध्ये बढीतीचे योग आहेत.   

तूळ - मन अशांत राहिल. आत्मविश्वासामध्ये अभाव राहिल. धैर्यामध्येही कमी दिसून येईल. व्यापार-व्यवसायात बदलाचे योग आहेत. बदलामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु लाभ होण्यास चांगला काळ असेल. 

वृश्चिक - मन शांत आणि प्रसन्न राहिल. आत्मविश्वास कमालीचा वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मान सन्मान मिळेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

धनू - आत्मविश्वासात अभाव राहिल. तरीही आनंदी क्षण अनुभवायला मिळेल. नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत. वरिष्ठांची मदत मिळेल. परंतु प्रवासाचे योग संभवतात. 
 
मकर - मनात निराशा आणि नकारात्मक विचारांचा प्रभाव राहू शकेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. बौद्धिक कार्यात सन्मानाचे योग . संवादात संयम ठेवा. वडिलोपार्जित संपत्तीमुळे वाद निर्माण होऊ शकतात.  

कुंभ - वाणीमध्ये संयमता राहिल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्राच्या मदतीने आर्थिक  स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.  

मीन - मनात प्रसन्नतेचे भाव राहतील. मात्र  स्वभावात चिडचिडेपणा येईल. कौटुंबिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक जबाबदारी देखील वाढू शकते. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीमध्ये प्रवासाचे योग. खर्च वाढेल.