पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १५ मार्च २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - दाम्पत्य सुखात वाढ होईल. शैक्षणिक कार्यांत अडचणी येऊ शकतात. आरोग्याप्रती सावध राहा. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 


वृषभ - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी अशी मानसिकता राहिल. आत्मविश्वास कमी असेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. उत्पन्न कमी-खर्च अधिक असेल.

मिथुन - आत्मविश्वास जाणवेल. मन अशांत राहिल. घरात धार्मिक कार्य होईल. चिडचडेपणा जाणवेल.

कर्क - आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील. मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास वाढेल. आईचे सहकार्य मिळेल. बदलीची शक्यता. 

सिंह - मन अशांत राहिल. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या - चिडचडेपणा जाणवेल. आत्मसंयत राहा. वैचारिक मतभेद होतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

तूळ - मानसिक शांतता राहिल. मनात निराशेचे भाव राहतील. वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक - क्षणात दुःखी, क्षणात आनंदी असे भाव राहतील. खर्चांत वाढ होईल. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

धनू - मानसिक तणाव जाणवेल. स्वभावात चि़डचिडेपणा राहिल. घरात अशांतता राहिल. आरोग्याकडे लक्ष द्या. उत्पन्नाची स्थित सुधारेल.

मकर - मानसिक शांतता जाणवेल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. आई-वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कुंभ - बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग जास्त असेल. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. संचित धन कमी होऊ शकते. खर्च वाढेल.

मीन - भावनांवर नियंत्रण ठेवा. मन अशांत राहिल. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. परदेश प्रवासाचे योग. मित्रांचे सहकार्य लाभेल.

पं. राघवेंद्र शर्मा