पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १५ डिसेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - आत्मविश्वास भरपूर असेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. परंतु, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहक वाद होऊ शकतो. तुमच्या बोलण्यामुळे समोरच्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतील.

वृषभ - मन अशांत राहिल. मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी सुधारणा होण्याची अपेक्षा.

मिथुन - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. परंतु, वाणीत सौम्यता राहिल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. धावपळ वाढू शकते.

कर्क - मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी बदलीचे योग. आवडीच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते.

सिंह - धार्मिक साहित्य वाचनात येईल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यांत सुखद परिणाम मिळतील. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त. चांगली संधी मिळण्याची अपेक्षा.

कन्या - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. नोकरीत बढतीची शक्यता. उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ - मन अशांत राहिल. नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. मानसिक ताणात वाढ होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - आत्मविश्वास कमी असेल. त्यामुळे चांगली संधी गमावण्याची शक्यता. भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा अडचणीत वाढ होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून धनप्राप्तीचे योग. 

धनू - आत्मविश्वास जाणवेल. चांगली संधी मिळेल. बोलणे संतुलित ठेवा. खर्चांत वाढ होईल. आईचा सहवास लाभेल. आरोग्याप्रती सावध राहा.

मकर - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होण्याचे योग. दाम्पत्य सुखात वाढ होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहिल. कपडे खरेदीवर खर्च वाढेल.

कुंभ - शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यांत यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. कपडे भेट स्वरुपात मिळू शकतात. कुटुंबात अडचणी येण्याची शक्यता.
 
मीन - बोलणे संतुलित ठेवा. अनावश्यक वादाचे योग. विचारपूर्वक निर्णय घ्या. संतती सुखात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते.

पं. राघवेंद्र शर्मा