पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १२ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - आत्मविश्वास कमी असेल. धर्माप्रती रुची वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मानसिक त्रास वाढेल.

वृषभ - मानसिक तणाव राहिल. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्राची भेट होईल.

मिथुन - आत्मविश्वास भरपूर राहिल. कुटुंबात सुख-शांती राहिल. आईला आरोग्याची समस्या भेडसावेल. चिडचिडेपणा जाणवेल.

कर्क - आत्मविश्वास वाढेल. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. 

सिंह - नोकरीत अधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्याचे सुखद परिणाम मिळतील.

कन्या - मानसिक शांतता राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. वाहन सुखात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील.

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मित्रांच्या साहाय्याने उत्पन्नाचे स्त्रोत विकसित होतील.

वृश्चिक - आत्मविश्वास जाणवेल. मानसिक त्रास वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अनियोजित खर्चांत वाढ होईल.

धनू - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नाहक वादापासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. 

मकर - क्षणात दुःखी, क्षणात आनंदी असे भाव राहतील. आरोग्याप्रती सावध राहा. संचित धन कमी होईल.

कुंभ - कुटुंबात धार्मिक संगीत कार्यक्रम होईल. राग टाळा. मित्रांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. बदलीचीही शक्यता.

मीन - मानसिक शांतता राहिल. संतती सुखात वाढ होईल. मनात निराशेचे भाव राहतील. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. 

पं. राघवेंद्र शर्मा