पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | ११ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मविश्वासात वाढ होईल. परंतु, स्वभावात चिडचिडेपणा जाणवू शकतो. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. शिक्षणात अडचणी येतील.

वृषभ - मन अशांत राहिल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. निवास सुखात वाढ होण्याची शक्यता. थकीत धन प्राप्त होऊ शकते. 

मिथुन - मानसिक शांतता राहिल. तरीही बोलण्यावर नियंत्रण ठेवा. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाचा नवा प्रस्ताव मिळू शकतो. 

कर्क - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. बोलण्यावर संयम ठेवा. एखाद्या मित्राच्या सहकार्याने नोकरीची संधी मिळू शकते. 

सिंह - आत्मविश्वास कमी राहिल. आत्मसंयत राहा. क्रोधाच्या अतिरेकापासून दूर राहा. वैवाहिक जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद होऊ शकतात.

कन्या - आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहतील. नोकरीत इच्छेविरुद्ध एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ - मन अशांत राहिल. कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. मान-सन्मानात वाढ होईल. परंतु, राहणीमान अव्यवस्थित राहिल.

वृश्चिक - आत्मविश्वासात वाढ होईल. बोलण्यावर नियंत्रण राहिल. आईशी मतभेद होऊ शकतात. संचित धनात वाढ होईल.

धनू - मानसिक शांतता राहिल. परंतु, आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. मनावर नकारात्मकातेचा प्रभाव राहू शकतो. व्यवसायात वाढ होऊ शकते.

मकर - आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. उत्पन्न कमी आणि खर्चांत वाढ अशी स्थिती राहिल. आरोग्याप्रती सावध राहा. 

कुंभ - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी अशी स्थिती राहिल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. वडिलांची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

मीन - आत्मसंयत राहा. क्रोध आणि आवेशाच्या अतिरेकापासून दूर राहा. एखाद्या मित्राच्या सहकार्याने संपत्तीत गुंतवणूक करु शकता. 

पं. राघवेंद्र शर्मा