पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मानसिक तणाव होऊ शकतो. आईचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहिल. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. 

वृषभ - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मन अस्वस्थ राहील. आत्मविश्वास कमी होईल. शैक्षणिक कामात अडथळे येऊ शकतात.

मिथुन - आत्मविश्वास राहिल. मन अशांत राहिल. कामात अडचणी येऊ शकतात. 

कर्क - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

सिंह - वाचनात रस असेल. जुन्या मित्राच्या सहकार्याने नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. 

कन्या - मानसिक शांती राहिल. आत्मसंयम ठेवा. बोलताना संयम ठेवा. जुन्या मित्राची भेट होईल. 

तूळ - राग येईल. बोलताना संयम ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगती होईल.

वृश्चिक - आत्मविश्वास कमी होईल. भांडणापासून दूर रहा. नोकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

धनू -  बोलण्यात सौम्यता राहिल. कामाप्रती उत्साह राहिल. बहिण-भावाचे सहकार्य मिळेल. व्यवसायाचा विस्तार होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर - मन अशांत राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव राहतील. वाहन सुख कमी होईल. अनियोजित खर्चात वाढ होईल. 

कुंभ - वाचनात रस वाढेल. व्यवसायाचा विस्तार होईल. शैक्षणिक आणि बौद्धिक कामांमध्ये व्यस्तता वाढू शकते.

मीन - मानसिक शांती राहिल. मात्र बोलताना संयम ठेवा. नोकरीत अधिक परिश्रम करावे लागतील. 

पं. राघवेंद्र शर्मा