पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | ८ डिसेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - क्षणात दुःखी आणि क्षणात आनंदी असे भाव राहतील. आईचा सहवास लाभेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल.

वृषभ - क्रोध आणि आवेशाच्या अतिरेकापासून दूर राहा. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.

मिथुन - धैर्यशीलता कमी राहिल. मन अशांत राहिल. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्च अधिक होईल.

कर्क - मानसिक तणाव राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता.

सिंह - नौकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद वाढू शकतात. एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते.

कन्या - कामाप्रती जोश आणि उत्साह राहिल. व्यवसायाच विस्तार होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ - क्षणात दुःखी आणि क्षणात आनंदी असे भाव राहतील. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. धार्मिक कार्यांत व्यस्त राहाल.

वृश्चिक - क्रोध अधिक राहिल. नाहक वादात पडू नका. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आई-वडिलांची साथ मिळेल.

धनू - कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. मान-सन्मानात वाढ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. घराच्या सजावटीवर खर्च कराल.

कुंभ - मानसिक शांतता राहिल. नोकरीसाठीच्या स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मीन - संतती सुखात वाढ होईल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. अधिक कष्ट करावे लागतील. कुटुंबात सुख-शांती राहिल.

पं. राघवेंद्र शर्मा