पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | ०१ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मसंयत राहा. क्रोध आणि आवेशाच्या अतिरेकापासून दूर राहा. आईला आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

वृषभ - मानसिक शांतता राहिल. काही जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. उत्पन्नात वाढ होईल. 

मिथुन - नोकरीच्या ठिकाणी एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अधिक कष्ट करावे लागतील. मानसिक तणाव जाणवेल. खर्च अधिक होईल.

कर्क - वाणीत कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आईच्या कुटुंबीयातील एखाद्या महिलेकडून धन प्राप्तीचे योग.

सिंह - आत्मविश्वास जाणवेल. परंतु, धैर्यशीलता कमी राहिल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल. उत्पन्नात घट होईल.

कन्या - मानसिक शांतता राहिल. परंतु, आत्मविश्वासात कमतरता राहिल. खर्च अधिक असतील. कामात बदल होऊ शकतो.

तूळ - आत्मसंयत राहा. क्रोधाचा अतिरेक टाळा. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहू शकतो. संचित धनात वाढ होईल.

वृश्चिक - आत्मविश्वास जाणवेल. क्षणात आनंदी-क्षणात दुःखी असे भाव मनात असतील. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम जाणवतील. 

धनू - मन अशांत राहिल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. दैनंदिन कार्यात अडचणी जाणवू शकतात.

मकर - आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. अनियोजित खर्चांमुळे त्रस्त असाल. नोकरीत इच्छेविरोधात एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते.

कुंभ - मन अशांत राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वाहन सुखात वाढ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन - क्षणात आनंदी-क्षणात दुःखी असे भाव राहतील. धर्माप्रति श्रद्धा भावर राहतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता. 

पं. राघवेंद्र शर्मा