पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ७ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. व्यवसायात वृद्धी होईल. फायदा कमाविण्याची संधी. मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृषभ - जप-तप करण्यात रुची वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता. कामात काही अडचणी येऊ शकतात.

मिथुन - मानसिक शांतता मिळेल. खर्च जास्त झाल्याने थोडी चिंताही वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात.

कर्क - मनात अशांतता राहिल. आत्मविश्वास कमी होईल. अनियोजित खर्च वाढेल. आईकडून धनप्राप्ती होऊ शकते.

सिंह - मानसिक शांतता राहिल. तरीही वैवाहिक जोडीदाराशी वाद होऊ शकतात. शैक्षणिक कामासाठी दौऱ्यावर जाण्याचे योग आहेत.

कन्या - मन अशांत राहिल. उत्पन्न वाढेल. पण खर्चही अधिक होईल. वाहनाच्या देखभालीवर जास्त खर्च होईल.

तूळ - कला आणि संगीत याची आवड वाढेल. भाव-बहिणींकडून धनप्राप्तीचे योग आहेत. उत्पन्न वाढेल.

वृश्चिक - दाम्पत्य सुखात वाढ होईल. आई-वडिलांचे सानिध्य लाभेल. वाणीमध्ये सौम्यता राहिल. साठवलेल्या संपत्तीत वाढ होईल.

धनू - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास कमी होईल. वास्तूच्या देखभालीवर खर्च होईल. 

मकर - मनात नकारात्मक विचार येतील. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होण्याची शक्यता आहे. राहणीमान कष्टप्रद होईल.

कुंभ - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात असतील. एखाद्या मित्रामुळे उत्पन्नाचे स्रोत मिळतील.

मीन - स्वभावात चिडचिडेपणा येईल. कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. शैक्षणिक कामात यश मिळेल.

पं. राघवेंद्र शर्मा