पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ७ डिसेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग. प्रवास कष्टप्रद होऊ शकतो. व्यवसायात अडचणी येतील.

वृषभ - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. खर्च वाढेल.

मिथुन - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. धैर्यशीलपणा कमी होईल. तब्येतीची काळजी घ्या. 

कर्क - मानसिक शांतता राहिल. आत्मसंयम ठेवा. नोकरीमध्ये बदली होण्याचे योग. 

सिंह - शैक्षणिक कामात यश मिळेल. एखाद्या मित्राशी वैचारिक मतभेद होतील. उत्पन्न कमी होऊ शकते.

कन्या - क्षणात दुःखी क्षणात आनंदी असे भाव मनात राहतील. एखाद्या राजकीय नेत्याची भेट होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल.

तूळ - कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. मन अशांत राहिल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक - मानसिक तणाव राहिल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील. विनाकारण वादात पडू नका. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल.

धनू - जप-तप करण्यात रुची वाढेल. नोकरीमध्ये बदल होण्याचे योग. कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. उत्पन्नात वाढ होईल.

मकर - कुटुंबासोबत एखाद्या यात्रेवर जाण्याचे योग. कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. वडिलांना एखादा आजार होऊ शकतो.

कुंभ - नोकरीसाठी दिलेल्या स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. भावांचे सहकार्य मिळेल.

मीन - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास वाढेल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाची संधी मिळेल.

पं. राघवेंद्र शर्मा