पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ३१ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मविश्वास जाणवेल. परंतु, अति उत्साहीपणा टाळा. एखाद्या मित्राकडून व्यवसाय वाढीचा प्रस्ताव मिळू शकतो.

वृषभ - भौतिक सुखात वाढ होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. संततीकडून सुखद वार्ता मिळू शकते. धनस्थिती सुधारेल.

मिथुन - मन अशांत राहिल. मानसिक रुपाने त्रस्त असाल. व्यवसाय विस्तारात भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळू शकते.

कर्क - कुटुंबातील एखाद्या बुजुर्ग व्यक्तीकडून धन प्राप्ताचे योग आहेत. नोकरीत पदोन्नातीची संधी मिळू शकते. बदलीचीही शक्यता.

सिंह - आत्मसंयत राहा. क्रोध आणि आवेशाच्या अतिरेकापासून वाचा. गृहसौख्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते.

कन्या - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कौटुंबिक समस्या त्रस्त करु शकतात. राहणीमानात अव्यवस्थित असू शकते.

तूळ - क्रोध अधिक राहिल. बोलणे संतुलित ठेवा. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता आहे. राहणीमान कष्टमय राहिल.

वृश्चिक - दाम्पत्य सुखात वाढ होईल. संततीकडून सुखद वार्ता समजू शकते. परंतु, आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

धनू - शैक्षणिक कार्यांत अडचणी येऊ शकतात. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखाद्या मित्राच्या सहाय्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते.

मकर - मनात नकारत्मकतेचा प्रभाव राहू शकतो. कौटुंबिक समस्या त्रस्त करु शकतात. अनियोजित खर्चांत वाढ होईल.

कुंभ - मन अशांत राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वाहन सुखात वाढ होईल. कला आणि संगीतात रस निर्माण होईल.

मीन - संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक मित्रांचे सहकार्य मिळेल. घरगुती समस्या त्रस्त करु शकतात. राहणीमान कष्टमय राहिल.

पं. राघवेंद्र शर्मा