पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ३० नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. नोकरीत अधिकाऱ्यांबरोबर मतभेद वाढू शकतात. वाणीत कठोरतेचा प्रभाव राहू शकतो. धर्माप्रती श्रद्धाभाव राहिल.

वृषभ - क्रोध आणि आवेशाच्या अतिरेकापासून दूर राहा. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संततीला कष्ट करावे लागेल. खर्चांत वाढ होईल.

मिथुन - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. दाम्पत्य सुखात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल. आरोग्याकडे लक्ष द्या.

कर्क -  मन अशांत राहिल. नोकरीत अडचणीचा सामना करावा लागू शकतो. बदलीची शक्यता आहे.

सिंह - मानसिक शांतता राहिल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यांत यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल.

कन्या - घरात धार्मिक कार्य होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. जेवणात रुची वाढेल.

तूळ -  मन अशांत राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. धर्म-कर्मात रुची वाढू शकते. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

वृश्चिक - मन अशांत राहिल. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. आरोग्याप्रती सावध राहा. वैद्यकीय खर्च वाढू शकतो.

धनू - कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. मान-सन्मानात वाढ होईल. मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. मित्रांची साथ मिळेल.

मकर - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबाबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास होऊ शकतो.

कुंभ - धार्मिक संगीताप्रती आवड निर्माण होऊ शकते. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल.

मीन - कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. नोकरीत इच्छेविरु्ध एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अधिक कष्ट करावे लागेल.

पं. राघवेंद्र शर्मा