पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | २८ मार्च २०२०

राशी भविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीसाठी दिलेल्या परीक्षेमध्ये यश मिळेल. प्रवासात अडथळा येईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 

वृषभ - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. मित्राची भेट होईल. बहीण-भावाच्या सहकार्याने व्यवसायाला गती मिळेल. खर्चात वाढ होईल. कामात अडचणी येतील. 

मिथुन - मानसिक शांती मिळेल. बोलताना संयम ठेवा. अभ्यासात रस वाढेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. 

कर्क - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. मनात आशा-निराशा असे भाव राहतील. कुटुंबात मान-सन्मान वाढेल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. अनियोजित खर्च वाढेल. 

सिंह - मनात निराशेचे भाव राहतील. मन अशांत राहिल. आत्मविश्वास राहिल. मात्र अतिउत्साही होणे टाळा. आत्मसंयम ठेवा. मान-सन्मान वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. 

कन्या - संयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. वाहन सुख कमी होईल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. 

तूळ - मानसिक शांती राहिल. लेखन-बौध्दिक कार्यात अडचणी वाढू शकतात. मनात निराशेचे भाव राहतील. मन अशांत राहिल. घर सुखात वाढ होईल. खर्च वाढेल. 

वृश्चिक - घरात धार्मिक कार्य होईल. वाहन सुखात वाढ होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. भावाच्या मदतीने व्यवसायाला गती मिळेल. कपड्यांवर जास्त खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. 

धनू - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. मुलांच्या सुखात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. उत्पन्नात वाढ होईल. मनात शांत आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. आत्मविश्वास कमी होईल. अनियोजित खर्च वाढेल. 

मकर - आईचा सहवास मिळेल. घर सुखात वाढ होईल. जुन्या मित्रांची भेट होईल. मित्रांसोबत धार्मिक स्थळी भेट द्याल. घरात धार्मिक कार्य होईल. घराच्या सजावटीसाठी खर्च वाढेल. 

कुंभ - आत्मविश्वास कमी होईल. मानसिक शांती राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. नोकरीत इच्छेविरुद्ध जबाबदारी मिळू शकते.

मीन - आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. वैवाहिक जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. 

 

पं. राघवेंद्र शर्मा