पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - धैर्यशीलपणा कमी होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक कामात अडचणी येतील. खर्च वाढेल.

वृषभ - कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या. खर्च अधिक होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मिथुन - मानसिक शांतता राहिल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. बढतीचे योग. उत्पन्नात वाढ होईल.

कर्क - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेवर जाण्याचे योग आहेत. 

सिंह - आत्मविश्वास कमी होईल. बोलताना संयम बाळगा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या - मानसिक तणाव राहिल. कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. धर्माबद्दल श्रद्धाभाव राहिल. उत्पन्नाचे मार्ग दिसतील.

तूळ - वस्त्रांबद्दलची आवड वाढेल. नोकरीमध्ये एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अधिक कष्ट करावे लागतील.

वृश्चिक - जप-तप करण्यात रुची वाढेल. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. खर्च अधिक होईल. आईकडून धनप्राप्ती होऊ शकते.

धनू - आळस अधिक येईल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. व्यवसायाच्या स्थितीत सुधारणा होईल. फायदा होण्याची संधी.

मकर - संततीकडून सुखद बातमी मिळू शकते. एखाद्या मित्राच्या सहकार्याने नोकरीची संधी मिळेल.

कुंभ - वाणीमध्ये कठोरपणा राहिल. बोलताना संयम बाळगा. एखाद्या मित्राच्या सहकार्याने उत्पन्नात वाढ होईल.

मीन - मन अशांत राहिल. धर्म-कर्मामध्ये व्यग्र राहाल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो.

पं. राघवेंद्र शर्मा