पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १७ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - मनात अशांतता राहिल. धैर्यशीलपणा कमी होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृषभ - जप-तप करण्यात रुची वाढेल. नोकरीमध्ये इच्छेविरुद्ध एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळेल. अधिक कष्ट करावे लागतील. 

मिथुन - बोलताना कठोर शब्दांचा वापर केला जाईल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. तब्येतीची काळजी घ्या.

कर्क - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. नोकरीमध्ये बदलाचे योग आहेत. कुटुंबापासून दूर जावे लागेल.

सिंह - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. वैवाहिक जोडीदाराशी वाद होऊ शकतात. आई-वडिलांचा सहवास लाभेल.

कन्या - तब्येतीची काळजी घ्या. धार्मिक कामात व्यग्र राहाल. साठवलेल्या संपत्तीत घट होईल.

तूळ - क्षणात दुःखी क्षणात आनंदी असे भाव मनात राहतील. उत्पन्न वाढेल. मनात नकारात्मक विचार येतील.

वृश्चिक - नोकरीसाठी दिलेल्या स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीमध्ये यश मिळेल. शासनाचे सहकार्य मिळेल.

धनू - नोकरीमध्ये परिवर्तनाचे योग आहेत. कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. उत्पन्नात वाढ होईल. कार्यक्षेत्राचा विस्तार होईल.

मकर - मानसिक तणाव राहिल. आईला एखादा आजार होऊ शकतो. एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क होऊ शकतो. व्यवसायाच्या वाटा मिळतील.

कुंभ - मानसिक शांतता राहिल पण कौटुंबिक समस्यामुळे त्रस्त राहाल. मित्राचे आगमन होईल.

मीन - रागाचा अतिरेक होण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. संततीला त्रास होईल.

पं. राघवेंद्र शर्मा