पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १६ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. मात्र अतिउत्साही होणे टाळा. कौटुंबिक समस्यांनी चिंतेत रहाल. बोलताना संयम ठेवा. 

वृषभ - बोलण्यात सौम्यता राहिल. आत्मविश्वास राहिल. जुन्या मित्राची भेट होईल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल.

मिथुन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. एखाद्या मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्त्रोत विकसित होतील. 

कर्क - मन अशांत राहिल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

सिंह - आत्मविश्वास कमी होईल. वाचण्यात रस वाढेल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल.

कन्या - बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलण्यात संयम ठेवा. संचित धन कमी होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

तूळ - कौटुंबिक जबाबदारी वाढेल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. 

वृश्चिक - उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. आईकडून पैसे मिळू शकतात. जास्त काम करावे लागेल. 

धनू - मानसिक शांती राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. मात्र वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मकर - मन अशांत राहिल. स्वभावात हट्टीपणा राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल. वाहन सुखात वाढ होईल. भावाचे सहकार्य मिळेल. 

मीन - नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मात्र कामाची अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अधिक कष्ट करावे लागतील. 

पं. राघवेंद्र शर्मा