पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | १५ फेब्रुवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - क्षणात आनंदी क्षणात दुःखी अशी मनस्थिती राहिल. खर्च अधिक झाल्यामुळे चिंतेत राहाल. आई-वडिलांकडून आर्थिक मदत होईल.

वृषभ - मानसिक शांतता राहिल. कला आणि संगीत याची आवड वाढेल. बोलताना संयम बाळगा. तब्येत सांभाळा. एखादा आजार होऊ शकतो.

मिथुन - मान-सन्मान यामध्ये वाढ होईल. सरकारी मदत मिळेल. आई-वडिलांना एखादा आजार होऊ शकतो. एखाद्या मित्राच्या सहकार्यामुळे रोजगाराची संधी.

कर्क - आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील. मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील. कार्यक्षेत्रात परिवर्तन होईल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. अतिउत्साहीपणा टाळा. धैर्यशीलपणा कमी होईल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. तब्येतीला जपा.

कन्या - मन अशांत राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. एखाद्या मित्राचे आगमन होईल. खर्च अधिक होईल. आत्मविश्वास कमी होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद.

तूळ - कुटूंबाकडून सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यातील आवड कमी होईल. आईकडून संपत्ती मिळेल. यात्रेवर जाण्याचे योग. मानसिक शांतता राहिल.

वृश्चिक - व्यवसासाठी बाहेरगावी जावे लागू शकते. अधिक कष्ट करावे लागतील. वास्तूच्या देखभालीवरील खर्च वाढेल. रागाचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या.

धनू - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास कमी होईल. अनियोजित खर्च वाढेल. जपतप करण्यात रुची वाढेल. शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होईल.

मकर - वैवाहिक जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतात. नोकरीमध्ये बदलाचे योग आहेत. बढती मिळण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल. आळसही वाढेल.

कुंभ - मन अशांत राहिल. धैर्यशीलपणा कमी होईल. जुन्या मित्रांची भेट होईल. मानसिक शांतता राहिल. कुटूंबातील एखाद्या महिलेकडून धनप्राप्तीचे योग. धर्माबद्दल मनात श्रद्धाभाव ठेवा.

मीन - आत्मसंयम ठेवा. कौटुंबिक समस्या वाढतील. कुटूंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतील. नोकरीमध्ये बढतीचे योग. रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या.

पं. राघवेंद्र शर्मा