पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ११ जानेवारी २०२०

राशी भविष्य

मेष – बोलताना संयम ठेवा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ – स्वभावात चिडचिडेपणा राहिल. मात्र बोलण्यात सौम्यता राहिल. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होतील. कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल.

मिथुन – क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. गोड खाण्याकडे कल वाढेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

कर्क – आत्मविश्वास कमी राहिल. कौटुंबिक समस्यांनी चिंतेत रहाल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. आत्मविश्वास कमी होईल. भावंडांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

सिंह – वाचनात रस वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. मित्राचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. कुटुंबात सुख-शांती राहिल.

कन्या – कुटुंबात धार्मिक कार्य होतील. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. नोकरीत परिवर्तनाची संधी मिळू शकते.

तूळ – आत्मविश्वास राहिल. बहिण-भावाचे सहकार्य मिळू शकते. धर्माप्रति श्रध्दा राहिल. बौध्दिक कार्यातून उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात.

वृश्चिक – धैर्यशीलता कमी होईल. वाहन सुखात वाढ होईल. आई-वडिलांकडून पैसे मिळू शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. भावंडांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

धनू –  आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. वैवाहिक जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. व्यवसायात मित्राचे सहकार्य मिळू शकते. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल.

मकर – मन अशांत राहिल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. खर्चात वाढ होईल.

कुंभ – आई-वडिलांचा सहवास मिळेल. धार्मिक संगीताकडे कल वाढेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी मिळतील. मानसिक शांती राहिल.
 
मीन – शैक्षणिक आणि बौध्दिक कार्यात यश मिळेल. मान-सन्मान वाढेल. कपड्यांवर खर्च वाढेल. मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. आरोग्याची काळजी घ्या.
 
पं. राघवेंद्र शर्मा