पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ९ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. कुटुंबात सुख-शांती राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. 

वृषभ - आत्मसंयम ठेवा. मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. 

मिथुन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव राहतील. दाम्पत्य सुख वाढेल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. 

कर्क - मन अशांत राहिल. कौटुंबिक समस्या वाढतील. मानसिक ताण राहिल. वडिलांचे सहकार्य मिळेल. 

सिंह - धर्माबद्दल श्रध्दा राहिल. धार्मिक स्थळाच्या निर्मितीसाठी मदत कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

कन्या - बोलताना संयम ठेवा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. व्यवसायात वाढ होईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. 

तूळ - कला आणि संगिताकडे कल वाढेल. घरातील वृध्द व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

वृश्चिक - मानसिक तणाव राहिल. आत्मविश्वास कमी होईल. नोकरीत इच्छेविरुध्द जबाबदारी मिळू शकते. 

धनू - शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल. जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्च वाढेल. 

मकर - मन अशांत राहिल. कुटुंबासोबत प्रवास करु शकता. प्रवास फायदेशीर होईल. 

कुंभ - नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीची संधी आहे. उत्पन्न वाढेल. व्यवसायाचा विस्तार होईल. 

मीन - शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कुटुंबात मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आरोग्याची काळजी घ्या. 

पं. राघवेंद्र शर्मा