पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ७ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - मन अशांत राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्च अधिक होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ - संगीताकडे कल वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आईसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. 

मिथुन - कला आणि संगीताकडे कल वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आईसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. 

कर्क - मानसिक शांती राहिल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आईची मदत मिळेल. अधिक परिश्रम करावे लागतील. 

सिंह - मन अशांत राहिल. धैर्यशीलता कमी होईल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसे मिळू शकतात. 

कन्या - बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो. मात्र क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. व्यवसायाच्या विस्तारासाठी वडिलांकडून पैसे मिळू शकतात. 

तूळ - मानसिक शांती राहिल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. मात्र वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. खर्च वाढेल. 

वृश्चिक - वाचण्यात रस वाढेल. कुटुंबात सुख-शांती राहिल. मात्र आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. खर्च वाढेल. 

धनू - आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. बहिण-भावांचे सहकार्य मिळेल. भेटवस्तू म्हणून कपडे मिळू शकतात. 

मकर - मानसिक शांती राहिल. दाम्पत्य सुखात वाढ होईल. कुटुंबासोबत प्रवास करु शकता. खर्च वाढेल. 

कुंभ - नोकरी बदलण्याची शक्यता आहे. कदाचित दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन - आत्मसंयम ठेवा. गोड पदार्थ खाण्याकडे कल असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. 

पं. राघवेंद्र शर्मा