पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ६ एप्रिल २०२०

राशी भविष्य

मेष - मनात आशा-निराशा असे भाव राहतील. नोकरीसाठी दिलेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. 

वृषभ - कला आणि संगीतामध्ये रस वाढेल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. धैर्यशीलता कमी होईल. वैवाहिक जोडीदारासोबत वाद होतील. खर्चात वाढ होईल. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. 

मिथुन - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. कला आणि संगीताकडे कल वाढेल. शैक्षणिक आणि बौध्दिक कार्यात यश मिळेल. खर्चात वाढ होईल. आरोग्यची काळजी घ्या. 

कर्क - मानसिक ताण राहिल. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळा. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. 

सिंह - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आईला आरोग्याचे विकार होतील. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. मान-सन्मान वाढेल. 

कन्या - मन अशांत राहिल. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. वरिष्ठांसोबत मतभेद होतील. गोड खाण्याकडे कल वाढेल. धर्माप्रती श्रध्दा वाढेल. 

तूळ - आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्चात वाढ झाल्याने चिंतेत रहाल. मानसिक शांती मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. वाहन सुखात वाढ होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - कला आणि संगीताकडे कल वाढेल. व्यवसायात वृद्धी होईल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीकडून धन प्राप्ती होईल. फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती मिळेल. 

धनू - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. बोलताना संयम ठेवा. आळशीपणा वाढेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. वाहन सुखात वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

मकर - आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. अतिउत्साही होऊ नका. आत्मसंयम ठेवा. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. अनियोजित खर्च वाढेल. 

कुंभ - बोलताना संयम ठेवा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. आईचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम घ्यावे लागतील. नोकरीत इच्छेविरुद्ध जबाबदारी मिळू शकते. 

मीन - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. बोलण्यात सौम्यता राहिल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल. 

पं. राघवेंद्र शर्मा