पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ३० मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - मानसिक शांती लाभेल. बोलताना संयम ठेवा. आत्मविश्वास भरपूर राहिल. कौटुंबीक समस्यांमुळे घरात चिंतेचं वातावरण असेल. उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. शैक्षणिक क्षेत्रात कठीण प्रसंगाचा  सामना करावा लागेल. कौटुंबात धार्मिक कार्य होतील. मित्रांचं सहकार्य प्राप्त होईल.

मिथुन -  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  बोलताना  संयम ठेवा. कुटुंबांत  तणावाचं वातावरण  असेल. मित्राचं सहाकार्य प्राप्त होईल. 

कर्क - आत्मविश्वासात वाढ होईल. मन अशांत राहिल. कुटुंबाचं सहकार्य प्राप्त होईल. धार्मिक कार्यात रुची प्राप्त होईल. अनियोजीत खर्चात वाढ होईल.

सिंह - मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. मात्र मनात असंतोष खदखदत राहिल. कौटुंबीक समस्यांमुळे मन चलबिचल होईल.

कन्या - मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. मनात निराशेचा भाव दाटेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. गोड खाण्यात रुची वाढेल. 

तूळ - मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. उत्पन्नात कमी जाणवेल तर खर्चातही वाढ होईल.

वृश्चिक - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मन अशांत राहिल.  तब्येतीची काळजी घ्या. मित्राचं सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगतीचा योग आहे.

धनू -  आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कौटुंबीक समस्यांमुळे मन बेचैन होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर - मनात नकारात्मक भाव राहतील. जोडीदाराच्या तब्येतीला जपा. शैक्षणिक क्षेत्रात  यश प्राप्त होईल.

कुंभ -  घरात धार्मिक कार्य पार पडतील. मन शांत आणि प्रसन्न राहिल.  उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत यशाची संधी प्राप्त होईल. 

मीन - संयम बाळगा. मनात असंतोष खदखदत राहिल. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. 

पं. राघवेंद्र शर्मा