पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | २७ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - कौटुंबीक जीवन सुखकारक असेल. सुखात वाढ होईल.  कुटुंबात धार्मिक कार्य होईल. अनपेक्षित भेट मिळले. मुलांकडून सुखद वार्ता समजेल. 

वृषभ - स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक करु नका आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कुटुंबीयांचं सहकार्य लाभेल. खर्चात वाढ होईल. भावंडासोबत मदभेद संभवतील. 

मिथुन - आशा- निराशा मिश्रीत भाव राहिल. आरोग्याची काळजी घ्या.  अनेक कठीण प्रसंगाना सामोरं जावं लागेल. खर्चात वाढ होईल. भावंडांचं सहकार्य मिळेल. उत्पन्नात घट होईल. 

कर्क - मन अशांत राहिल.  अज्ञात भीतीनं मनं ग्रासेल. कुटुंबात सुख शांती नांदेल.  कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाण्याचा योग येईल. आरोग्याची काळजी घ्या.  

सिंह - मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. कपड्यांची अधिक खरेदी होईल.

कन्या - कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम घ्यावे लागतील. वाढत्या खर्चामुळे मन चिंतेनं ग्रासेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.  नोकरीत कठीण प्रसंगांना समोरं जाव लागेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत  मतभेद होण्याची शक्यता आहे. 

तूळ -  स्वत:वर नियंत्रण ठेवा. रागाचा अतिरेक करु नका. आत्मविश्वास भरपूर वाढेल. कला आणि संगितात रुची वाढेल. नोकरीत प्रगतीची संधी. आईचे सहकार्य लाभेल. परिवाराचंही सहकार्य लाभेल. 

वृश्चिक -  आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मानसिक शांती लाभेल. मात्र रागाचा अतिरेक करू नका. कुटुंबात धार्मिक कार्य पार पडतील. जोडीदारासोबत मतभेद निर्माण होतील. 

धनू - मानसिक शांती राहिल. वडिलांचं सहकार्य लाभेल. कौटुंबिक समस्येनं मन चिंताग्रस्त होईल. आईला आरोग्याची समस्या जाणवेल. खर्चात वाढ होईल. 

मकर - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. स्वत:वर नियंत्रण ठेवा. जोडीदाराला आरोग्याची समस्या जाणवेल. कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडेल. स्वभाव चिडचिडा राहिल. आईला आरोग्याची समस्या जाणवेल.

कुंभ - मन अशांत राहिल. आई- वडिलांचे सहकार्य लाभेल. मित्राच्या मदतीनं नोकरीची नवी संधी उपलब्ध होईल.  बोलताना संयम ठेवावा. जोडीदारास आरोग्याची समस्या जाणवेल.

मीन -  खर्चात वाढ होईल त्यामुळे मन अशांत राहिल. भावंडांसोबत वैचारिक मतभेद संभवतील. मित्राचं सहकार्य मिळेल. अभ्यासात रुची वाढेल. 
पं. राघवेंद्र शर्मा