पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | २४ फेब्रुवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  आत्मविश्वास भरपूर वाढेल. कठीण प्रसंगाचा  सामना करावा लागेल.  कौटुंबीक समस्येमुळे मन निराश होईल. कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होऊ शकतात.  खर्चात वाढ होईल. 

वृषभ -  जोडीदाराला आरोग्याची समस्या जाणवेल.  आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कला- संगीतात रुची वाढेल. जोडीदारासोबत मदभेद होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होऊ शकतात.  

मिथुन - मानसिक तणाव जाणवेल. स्वभावात चिडचिडेपणा जाणेल. बोलताना संयम बाळगा. वाहन सुखात वाढ होईल. आईचे सहकार्य लाभेल.  

कर्क - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मानसिक शांती लाभेल.  कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. वडिलांच्या संपत्तीचा लाभ मिळेल. बोलण्यात संयम बाळगा. अनियोजित खर्चात वाढ होईल. 

सिंह - संयम बाळगा. रागाच्या अतिरेकापासून स्वत:ला दूर ठेवा. कौटुंबीक समस्यांमुळे मन चिंतेत राहिल.   नोकरीत कठीण  प्रसंगांना सामोरं जावं लागेल. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या -  मन नकारात्मक विचारांनी चिंतेत राहिल.  पाठ- पठनात रुची वाढेल. कौटुंबीक जीवन सुखकारक होईल.  वडिलांकडून धनलाभाची शक्यता आहे. मित्राचं सहकार्य लाभेल. मन अशांत राहिल. खर्चात वाढ होईल. 

तूळ - मानसिक ताण जाणवेल. जोडीदारास आरोग्याची समस्या जाणवेल. खर्चात अधिक वाढ होईल, आई वडिलांचं सहकार्य लाभेल. परिश्रम अधिक घ्यावे लागतील. शैक्षणिक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल. 

वृश्चिक - कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडेल. मन अशांत राहिल. नोकरीत प्रगतीचा योग आहे. कामात वाढ होईल. सहकाऱ्यांची मदत होईल. 

धनू -  आत्मविश्वासाची कमी जाणेल. मन अशांत राहिल.  कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येईल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. आईला आरोग्याची समस्या जाणवेल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारीचा भार अंगावर पडेल. 

मकर - आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. मित्राचं सहकार्य लाभेल.  स्वत:वर नियंत्रण ठेवा. उत्पन्नात आणि खर्चात देखील वाढ होईल. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. मात्र आशा- निराशा मिश्रित भाव मनात दाटून येतील. आई- वडिलांचे सहकार्य लाभेल.  जुन्या मित्राची भेट संभवेल. कुटुंबासोबत पर्यटनाला जाण्याचा योग.

मीन - शैक्षणिक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल. मन शांत राहिल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. परिश्रम अधिक घ्यावे लागतील. आशा निराशा मिश्रीत भाव मनात राहतील.

पं. राघवेंद्र शर्मा