पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | २३ मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  शैक्षणिक कार्यक्षेत्रात अडचणी येतील. आत्मसंयम ठेवा. कौटुंबीक समस्येमुळे मन निराश होईल. आईचं सहकार्य लाभेल. 

वृषभ -  मन अशांत राहिल. कामाच्या ठिकाणी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. स्वत:वर संयम ठेवा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. 

मिथुन - आशा- निराशा मिश्रीत भाव मनात राहतील. मानसिक तणाव जाणवेल.  आत्मविश्वास भरपूर जाणवेल. मन शांत आणि प्रसन्न राहिल. कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागेल. 

कर्क - धैर्याची कमी जाणवेल. भावना नियंत्रणात ठेवा. कुटुंबाची साथ मिळेल. अनियोजित खर्चात वाढ होईल. मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबीक समस्येमुळे मन चिंतेत राहिल. खर्चात वाढ होईल.

सिंह - मानसिक शांती लाभेल. मात्र आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कामात रुची वाढेल. संचित पैशांत कमी जाणवेल. स्वभाव चिडचिडा जाणवेल.

कन्या - मन चिंतेत राहिल. कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम घ्यावे लागतील. भावंडांचं  सहकार्य लाभेल. रागाचा अतिरेक टाळा. जोडीदारासोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. संगीतात रुची वाढेल. 

तूळ - मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास भरपूर वाढेल. कला आणि संगितात रुची वाढेल. नोकरीत अधिकाऱ्याचं सहकार्य लाभेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - मन चिंतेत राहिल. स्वभाव हट्टी राहिल. मानसिक शांती लाभेल. नोकरीत परिवर्तनाचे योग आहेत. जोडीदाराचं सहकार्य लाभेल.

धनू - रागाचा अतिरेक होईल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. घरी तणावपूर्ण स्थिती असेल. बोलताना संयम ठेवा. नोकरीत प्रगतीचा योग आहे.

मकर - स्वत:वर नियंत्रण ठेवा. रागाचा अतिरेक करणं टाळा. नोकरीच्या ठिकाणी वैचारिक मतभेद संभवतील. जोडीदाराला आरोग्याची समस्या जाणवेल.

कुंभ - आशा- निराशा मिश्रित भाव असतील. मानसिक शांती राहिल. घरात धार्मिक कार्य संभवतील. उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवतील.

मीन - मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल. उत्पन्नात घट होईल आणि खर्चात वाढ होईल. 

पं. राघवेंद्र शर्मा