पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | १७ जून २०१९

राशिभविष्य

मेष - एखाद्या मित्राबरोबर वैचारिक मतभेद होऊ शकते. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. नोकरीनिमित्त प्रवास होऊ शकतो. 

वृषभ - क्षणात दुःखी क्षणांत आनंदी असे भाव मनात राहतील. व्यवसायातील स्थिती संतोषजनक राहिल. लाभाची संधी मिळेल. वडिलांना आरोग्याच्या तक्रारी संभावतील.

मिथुन - आत्मविश्वास राहिल. परंतु, धैर्यशीलता कमी राहिल. कुटुंबात आपसांत मतभेद होतील. संततीला कष्ट करावे लागेल.

कर्क - आईकडून धनप्राप्तीचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकते. अधिक कष्ट करावे लागेल. उत्पन्नात वाढ होईल.

सिंह - आत्मसंयत राहा. क्रोध अधिक राहिल. आईला आरोग्याचा तक्रारी जाणवतील. व्यवसायात मित्रांचे सहकार्य मिळू शकते.

कन्या - नोकरीसाठीच्या स्पर्धा परिक्षेत किंवा मुलाखतीत यश मिळेल. वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ - आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. पिढीजात व्यवसायात बदल होऊ शकतो. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - उत्पन्नात घट आणि खर्चांत वाढ होण्याची शक्यता. आरोग्याप्रति सावध राहा. मित्रांपासून दुरावण्याची शक्यता.

धनू - आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. वडिलांना आरोग्याच्या तक्रारी संभावतील.

मकर - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. उत्पन्नात घट आणि खर्चांत वाढ होईल. आईला आरोग्याच्या तक्राकरी जाणवतील.

कुंभ - आत्मसंयत राहा. रागापासून स्वतःचा बचाव करा. कुटुंब-परिवारात धार्मिक कार्य होऊ शकते. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल.

मीन - कौटुंबिक सुखात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल. वैवाहिक जोडीदारीशी मतभेद होऊ शकते. मित्रांचे सहकार्य राहिल.

पं. राघवेंद्र शर्मा