पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | १४ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाण्याचे नियोजन केले जाऊ शकते. 

वृषभ - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल. 

मिथुन - आत्मविश्वास राहिल. कला आणि संगीताकडे कल वाढू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगती होईल. 

कर्क -  आत्मविश्वास राहिल. जुन्या मित्रांसोबत प्रवास कराल. अनियोजित खर्च वाढेल. 

सिंह -  आत्मविश्वास कमी होईल. आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. बोलताना संयम ठेवा. व्यवसायाची स्थिती सुधारेल. 

कन्या - धैर्यशीलता कमी होईल. कला आणि संगीताकडे कल वाढेल. राजकीय नेत्याची भेट होईल. खर्चात वाढ होईल. 

तूळ - मन अशांत राहिल. वाद टाळा. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. खर्च वाढेल. 

वृश्चिक - वाचनात रस वाढेल. शैक्षणिक कार्यात आनंददायक परिणाम होतील. मान-सन्मान वाढेल. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

धनू - मन अशांत राहिल. आळशीपणा वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आईला आरोग्याचे विकार होतील. 

मकर - उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती असेल. मन अशांत राहिल. लेखकांना बौध्दिक कार्यात यश मिळेल. वाहन सुखात वाढ होईल. 

कुंभ - बोलण्यात कठोरतेचा परिणाम होईल. बोलताना संयम ठेवा. कौटुंबिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. आईचे सहकार्य मिळेल. 

मीन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कुटुंबात परस्पर मतभेद होऊ शकतात. शैक्षणिक कामात यश मिळेल. गोड खाण्याकडे कल वाढेल. 

पं. राघवेंद्र शर्मा