पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | १३ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मानसिक अंसतोष जाणवेल. व्यवसायात मित्राचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. आत्मविश्वास कमी असेल.

वृषभ - आशा-निराशेचे मिश्रित भाव मनात राहतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. आईकडून धनप्राप्तीचे योग.

मिथुन - वाणीत सौम्यता राहिल. मित्रांचे सहकार्य लाभेल. संतती सुखात वाढ होईल. दाम्पत्य सुखात वाढ होईल.

कर्क - क्षणात दुःखी, क्षणात आनंदी असे भाव राहतील. वाहन सुखात कमतरता येईल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. मन अशांत राहिल. 

सिंह - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. शैक्षणिक कार्यांत सफलता मिळेल. मानसिक शांतता राहिल. आळस जाणवेल.

कन्या - मानसिक शांतता राहिल. उत्त्पनानाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ - आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायात मित्राचे सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या समस्या वाढतील. 

वृश्चिक - नोकरीत परिवर्तनाची शक्यता. धनस्थिती सुधारेल. बदलीची शक्यता. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होईल.

धनू - स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होतील. आरोग्याप्रती सावध राहा. आई-वडिलांचे सहवास लाभेल. 

मकर - आत्मविश्वास कमी राहिल. मानसिक शांतता राहिल. आरोग्याकडे लक्ष द्या. रागात वाढ होईल. खर्च कमी होतील. उत्पन्नाची स्थिती सुधारेल.

कुंभ - नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. उत्पन्नात वाढ होईल. अति उत्साह टाळा.

मीन - शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. कुटुंबात सुख-शांती राहिल. कपड्यांवर खर्च वाढू शकतो. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

पं. राघवेंद्र शर्मा