पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | १२ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मविश्वास जाणवेल. एखाद्या मित्राकडून व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होईल. परंतु, खर्चातही वाढ होईल.

वृषभ - अध्यापनात रुची निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. पण अधिक कष्ट करावे लागती. उत्पन्नात वाढ होईल.

मिथुन - वाणीचा प्रभाव जाणवेल. वाणीमुळे थकीत कामे मार्गी लागतील. कला आणि संगीत क्षेत्रात रस वाढेल. 

कर्क - क्रोध आणि आवेशावर नियंत्रण ठेवा. नोकरीत बदलीचे योग आहेत. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत.

सिंह - धैर्यशीलतामध्ये कमतरता जाणवेल. आईचा सहवास मिळू शकतो. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त होईल. खर्च वाढेल.

कन्या - आत्मसंयत राहा. व्यर्थ वादापासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा जाणवू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवू शकतो. धनाची स्थिती सुधारणा होईल.

वृश्चिक - वाणीत सौम्यता राहिल. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल.

धनू - घर-परिवारात धार्मिक कार्य होतील. राहणीमान अव्यवस्थित राहू शकते. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील.

मकर - मानसिक तणाव जाणवू शकतो. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता. खर्चांत वाढ होईल. राहणीमान बिघडेल.

कुंभ - मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवू शकतो. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. आरोग्याप्रती सावध राहा.

मीन - आत्मविश्वास जाणवेल. परंतु, अति उत्साहीपणा टाळा. मित्रांचे सहकार्य मिळेल. शिक्षणात अडचणी जाणवतील.

पं. राघवेंद्र शर्मा