पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ९ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात असतील. कपड्यांप्रती आवड निर्माण होईल. शैक्षणिक कार्यांत अडचणी येऊ शकतात.

वृषभ - आत्मविश्वास जाणवेल. भौतिक सुखात वाढ होईल. वडिलांना आरोग्याची तक्रार जाणवेल.

मिथुन - मानसिक शांतता जाणवेल. परंतु, कौटुंबिक सुखात कमतरता जाणवेल. राहणीमान अव्यवस्थित राहिल. अधिक कष्ट करावे लागतील.

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. अनियोजित खर्च वाढतील. आत्मसंयत राहा.

सिंह - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. आई-वडिलांचे सानिध्य मिळेल.

कन्या - मनात निरासा आणि असंतोषाचे भाव राहतील. खर्चांत वाढ होईल. परंतु, उत्पन्नात सुधारणा होईल.

तूळ - आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात येतील. भाऊ-बहिणींच्या सहकार्याने व्यवसायाला गती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल.

वृश्चिक - वाणीत सौम्यता राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आईकडून धन प्राप्तीचे योग आहेत. राहणीमान कष्टप्रद असू शकते.

धनू - मानसिक शांतता राहिल. घर-परिवारात धार्मिक कार्य होईल. अधिक कष्ट करावे लागतील. संतती सुखात वाढ होईल.

मकर - कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. कुटुंबाबरोबर एखाद्या धार्मिक यात्रेवर जाऊ शकता. खर्च वाढतील.

कुंभ - क्षणात दुःखी आणि क्षणात आनंदी अशी स्थिती राहिल. कुटुंबाची साथ मिळेल. वाहन सुखात वाढ होऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मीन - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीचे सुखद परिणाम मिळतील.

पं. राघवेंद्र शर्मा