पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ०२ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - दिनचर्या बिघडेल. शैक्षिणक कार्यांत अडचणी येऊ शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ - मनात प्रसन्नतेचे भाव राहतील. वाहन सुखात वाढ होईल. लेखन आणि बौद्धिक कार्यामुळे धनार्जन होऊ शकते.

मिथुन - भाऊ-बहिणीच्या मदतीने व्यवसायाला गती मिळू शकते. लाभाची संधी मिळेल. वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क - कामात जोश आणि उत्साह राहिल. वाणीचा प्रभाव वाढील. तरीही बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

सिंह - वाणीत सौम्यता राहिल. परंतु, भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीत पदोन्नतीची संधी.

कन्या - मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. परंतु, स्वभावात चिडचिडेपणा जाणवू शकतो. उत्पन्नात सुधारणा होईल.

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. एखाद्या वडिलोपार्जित संपत्तीतून उत्पन्न मिळू शकते.

वृश्चिक - दाम्पत्य सुखात वाढ होईल. कुटुंबात मान-सन्मान प्राप्त होईल. आईकडून धनप्राप्तीचे योग आहेत. राहणीमान अव्यस्थित राहिल.

धनू - मन अशांत राहिल. आळस जाणवेल. कुटुंबात धार्मिक कार्याचे योग आहेत. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मकर - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. उत्पन्नात घट आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. 

कुंभ - मन अशांत राहिल. आत्मसंयत राहा. धार्मिक संगीताची आवड निर्माण होईल. शैक्षणिक कार्यात अडथळे येतील.
 
मीन - मानसिक शांतता राहिल. संततीकडून सुखद वार्ता समजू शकते. धर्म-कर्मात व्यस्त राहाल.

पं. राघवेंद्र शर्मा