पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | २ डिसेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. धर्माप्रती श्रद्धाभाव राहिल. संततीला कष्ट करावे लागतील.

वृषभ - मन अशांत राहिल. मानसिक तणाव दूर होऊ शकतो. पैशांची चणचण जाणवेल. कौटुंबिक समस्या त्रस्त करतील.

मिथुन - स्वभावात चिडचडेपणा जाणवेल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. संततीकडून आनंदाची वार्ता मिळू शकेल.

कर्क - आत्मविश्वास जाणवेल. परंतु, धैर्यशीलता कमी राहिल. वाहन सुख कमी होईल. खर्चाचे प्रमाण अधिक राहिल.

सिंह - आरोग्याप्रती सावध राहा. राहणीमान कष्टमय राहिल. कुटुंबात मतभेदाचे प्रसंग येतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कन्या - क्षणात आनंदी आणि क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्नात वाढ होईल.

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आत्मसंयत राहा. कला आणि संगीतात आवड निर्माण होऊ शकते. व्यवसायात सुधारणा होईल.

वृश्चिक - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद होऊ शकतात. आरोग्याप्रती सावध राहा.

धनू - पठन-पाठणात रुची निर्माण होईल. शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतील. बदलीचे योग आहेत.
 
मकर - मानसिक शांतता राहिल. परंतु, धैर्यशीलता कमी राहिल. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ - मानसिक शांतता राहिल. परंतु, कौटुंबिक जीवन कष्टमय राहू शकते. व्यवसाय विस्तारात भावंडांचे सहकार्य मिळेल.

मीन - मानसिक शांतता राहिल. परंतु. वाणीवर कठोरतेचा प्रभावही राहिल. कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागेल.

पं. राघवेंद्र शर्मा