पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ६ सप्टेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वास कायम राहिल. मात्र धैर्यशीलता कमी राहिल. कला आणि संगीताकडे कल वाढेल. पैशांची स्थिती सुधारेल. 

वृषभ - मन शांत राहिल. कौटुंबिक जीवन आंनदी राहिल. वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्च वाढेल. 

मिथुन - कामाप्रती उत्साह असेल. खूप मेहनत करावी लागेल. उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

कर्क - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. मित्राच्या मदतीने नोकरीची संधी मिळू शकते. 

सिंह - आत्मविश्वास राहिल. वैवाहिक जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. व्यवसायात वाढ होईल. नफा देखील वाढेल. 

कन्या - मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहिल. जास्त खर्चामुळे चिंतेत रहाल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

तूळ - धैर्याचा अभाव असेल. आत्मसंयम ठेव. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या व्याप्तीत वाढ होऊ शकते. 

वृश्चिक - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आईसोबत मतभेद होतील. कुटुंबियांसोबत फिरायला जाऊ शकता. 

धनू - मन अशांत राहिल. आळशीपणा वाढेल. कुटुंबियांसोबत धार्मिक स्थळी भेट देऊ शकता. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. आरोग्याबाबत जागरुक रहा. दिनक्रमात गोंधळ होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. 

कुंभ - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. शैक्षणिक कामात अडथळे येऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल.  

मीन - आत्मविश्वास राहिल. धर्म-कर्मामध्ये रस वाढेल. शैक्षणिक कामात यश मिळेल. मान-सन्मान वाढेल. 

पं. राघवेंद्र शर्मा