पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २९ नोव्हेंबर २०१९

आजचे राशीभविष्य

मेष - आत्मविश्वास दुणावेल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील.

वृषभ - मन अशांत राहिल. आत्मविश्वासात कमी जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांनाही आरोग्याची समस्या जाणवेल.

मिथुन - मानसिक शांती जाणवेल. आत्मविश्वास दुणावेल. मित्राचं सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ संभवतील.

कर्क -  आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. मानसिक तणाव जाणवेल. काही अनियोजीत खर्च वाढतील. 

सिंह - आत्मविश्वास दुणावेल, मात्र काही काळानं तो कमी झाल्याचंही वाटेल. कुटुंबात रुसवे- फुगवे पहायला मिळतील. जोडीदारचं सहकार्य लाभेल.

कन्या - स्वत:वर नियंत्रण ठेवा. क्रोधाची परिसिमा गाठू शकते. कामात अधिक मेहनत करावी लागेल. वडिलांकडून आर्थिक साहाय्य मिळेल.

तूळ -  धैर्याची कमी जाणवेल. कौटुंबीक जीवन कष्टदायी असेल. शैक्षणिक क्षेत्रात सुखद परिणाम जाणवतील. कार्यात  यश मिळेल.

वृश्चिक - मानसिक तणाव जाणवेल. भावनांना आवर घाला.  जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होती. इश्चित गोष्ट प्राप्त होईल. 

धनू - स्वभावात चंचलता जाणवेल. सुख: दु:खाचे अनुभव वाट्याला  येतील. खर्चात वाढ होईल.  आईचे सहकार्य लाभेल. 

मकर -  चटकन राग येईल. काही कौटुंबीक समस्या मन चिंतेत टाकतील. अनियोजित खर्चात वाढ होईल. अस्वस्थ राहाल. 

कुंभ - मानसिक शांती मिळेल. आत्मविश्वास भरपूर वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात सफलता मिळेल.  कार्यक्षेत्र रुंदावेल.

मीन - बोलण्यात कठोरता जाणवेल. मात्र संयमानं काही गोष्टी घ्या. कौटुंबीक समस्या वाढतील. कामात अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. 

पं. राघवेंद्र शर्मा