पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २८ फेब्रुवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - मन शांत आणि प्रसन्न राहिल. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. कपड्यांच्या खरेदीवर खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक ठिकाणी पर्यटनाला जाण्याचा योग. बोलताना संयम बाळगा.

वृषभ - मानसिक शांती लाभेल मात्र कामाच्या ठिकाणी कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. आशा- निराशा मिश्रीत भाव असतील. स्वभाव चिडचिडा राहिल. 

मिथुन - आशा- निराशा मिश्रीत दिवस असेल. आईचं सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे.  मनात नकारात्मक विचार येतील. 

कर्क -  आत्मविश्वास वाढेल मात्र स्वभाव चिडचिडा राहिल. आशा- निराशा मिश्रीत भाव राहिल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे.

सिंह -  आत्मविश्वास भरपूर जाणवेल, मात्र स्वभाव चिडचिडा राहिल. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. कुटुंबाची साथ लाभेल.  बोलताना संयम बाळगा.

कन्या - मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. भावनांना आवर घाला. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद संभवतील. घरात धार्मिक कार्य होईल.  

तूळ - मानसिक शांती लाभेल मात्र स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडेल. 

वृश्चिक - कला व संगीतात रुची वाढेल. आत्मविश्वास वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.  कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.  नोकरीत परिवर्तनाची शक्यता. 

धनू - मन अशांत राहिल. स्वभावात क्षणाक्षणाला बदल जाणवतील. मनात नकारात्मक विचार येतील. व्यर्थ वादविवादापासून स्वत:ला दूर ठेवा.

मकर - आत्मविश्वास भरपूर जाणवेल मात्र कामाचा आळसही येईल. आईला आरोग्याची समस्या जाणवेल. खर्चात वाढ होईल. 

कुंभ - मन अशांत राहिल. आपल्या भावनांना आवर घाला. अतिउत्साहीपणा टाळा. मनात नकारात्मक भाव येतील. नोकरीत परीवर्तनाची शक्यता. 

मीन - आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. भावनांना  आवार घाला. बोलताना संयम बाळगा. खर्चात वाढ होईल. कौटुंबीक समस्या जाणवतील.
पं. राघवेंद्र शर्मा