पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २३ ऑगस्ट २०१९

राशी भविष्य

मेष - मन शांत आणि आनंदी राहिल. आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या मित्राची भेट होईल. 

वृषभ - कुटुंबियांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचे नियोजन होऊ शकते. प्रवास सुखमय होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

मिथुन - मन शांत राहिल. मात्र वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. आईकडून पैसे मिळू शकतात. 

कर्क - कामात उत्साह वाढेल. शैक्षणिक कामात यश मिळेल. धर्माबाबत आदर वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. 

सिंह - आत्मविश्वास राहिल. मात्र धैर्यशीतला कमी होईल. वैवाहिक जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. 

कन्या - मनावर नकारात्मक विचारांचा परिणाम होऊ शकतो. जास्त खर्चामुळे त्रास होईल. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

तूळ - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. उत्पन्नाचे नवीन पर्याय विकसित होऊ शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल. 

वृश्चिक -  आत्मविश्वास कायम राहिल. मुलांच्या सुखात वाढ होईल. शैक्षणिक कामात यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. 

धनू - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. खर्चामध्ये वाढ होईल. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - आत्मसंतुष्ट रहा. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात अडथळे येऊ शकतात. 

मीन - बोलण्यात सौम्यता असेल. शैक्षणिक कामात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. 


पं. राघवेंद्र शर्मा