पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २२ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वास राहिल. मात्र धैर्यशीलता कमी होईल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल. 

वृषभ - मानसिक ताण वाढू शकतो. आत्मविश्वास कमी होईल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन - आत्मविश्वास वाढेल. मात्र आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. कामात अडचणी येतील. 

कर्क - आत्मसंयम ठेवा. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. खर्च वाढेल. 

सिंह - मनात आशा-निराशा असे भाव राहतील. नोकरीमध्ये प्रगती करण्याची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. 

कन्या - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव राहतील. बोलताना संयम ठेवा. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल. 

तूळ - कामात उत्साह राहिल. आईला आरोग्याचे विकार होतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. भांडण टाळा. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. 

धनू - आत्मविश्वास राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. एखाद्या मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढू शकते. 

मकर - राग जास्त येईल. घर सुखात वाढ होईल. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. 

कुंभ - आत्मविश्वास राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

मीन - मानसिक शांती राहिल. बोलताना संयम ठेवा. वाहन सुखात वाढ होईल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

पं. राघवेंद्र शर्मा