पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १५ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - बोलण्यात सौम्यता राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा राहिल. धर्माबाबत श्रध्दा वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

वृषभ - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. 

मिथुन - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत संबंध सुधारतील. उत्पन्न वाढेल. 

कर्क - मानसिक शांती राहिल. कला आणि संगिताकडे कल वाढेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील.

सिंह - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होतील. अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

कन्या - मन अशांत राहिल. मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

तूळ - राग जास्त येईल. आत्मसंयम ठेवा. कुटुंबासोबत परस्पर मतभेद होतील. खर्च वाढेल. 

वृश्चिक - मन अशांत राहिल. आत्मविश्वास राहिल. आरोग्याबाबत जागरुक रहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. 

धनू - वाचण्यात रस वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल.

मकर - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कुटुंब सुखात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. आई-वडिांचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. शैक्षणिक कामात अडचणी येतील. कामात अधिक परिश्रम करावे लागतील. 

मीन - कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. आरोग्याबाबत जागरुक रहा. खर्च वाढेल. 

पं. राघवेंद्र शर्मा